महाराष्ट्र

सांगोला महाविद्यालयाच्या शिरपेचारत मानाचा तुरा;  विद्यापीठ परीक्षेत सहा सुवर्णपदकासह सतरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

सांगोला/प्रतिनिधी: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल-2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये येथील सांगोला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यापीठ परीक्षेमध्ये या महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले त्याचबरोबर अन्य अकरा विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचेकडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

 

विद्यापीठ परीक्षेमध्ये या महाविद्यालयाचा विद्यार्थी गुलाम गौस तांबोळी यांने 88.88 टक्के गुण मिळवून बी.ए हिंदी आणि सर्वभाषा विषयांमध्ये अशी दोन सुवर्णपदके प्राप्त केले. कु.अस्मिता सर्जेराव मराठे (इतिहास विभाग) हिने 86.89 टक्के गुण मिळवून बी.ए. पदवीचे सुवर्णपदक प्राप्त केले. कु. मयुरी दादासो काशीद हिने बी. कॉम. तीन हिने ८३.७८ टक्के गुण मिळवून बी.कॉम. तीनचे सुवर्णपदक एक आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकौटंट ऑफ इंडिया सुवर्ण पदक अशी दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. कु. मयुरी तानाजी चव्हाण एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) विषयात 80.60 टक्के गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. कु. स्वप्नाली इंगोले हिने 92.06 टक्के गुण मिळवून बी.एस्सी. विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला. बी.एस्सी.(ई.सी.एस.) या वर्गामध्ये या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रणाली भिंगे हिने ८५.६५ टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. पूजा शिंदे हिने ८४.०३ टक्के गुण मिळवून व्दितीय, दिग्विजय चव्हाण यांनी ८४.६२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, कु. सरस्वती पुजारी हिने 84.49 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक तर योगेश मोरे याने ८२.५४ टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये पाचवा क्रमांक मिळवला. बी.एस्सी.(ई.सी.एस.) या वर्गाचे या महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी विदयापीठ मेरिटमध्ये आहेत.

 

विद्यापीठ परीक्षेमध्ये बी.सी.ए. वर्गाचे तीन विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये या महाविलयाचे आहेत. या वर्गाची कु. आरती शिंदे हिने ८५.५१ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. अल्फिया तांबोळी हिने 86.32 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तर कु. आकांक्षा यलमार हिने 84.65 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला. एम.एस्सी. संगणक वर्गामध्ये कु. तेजस्विनी पवार हिने 79.24 टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. आयेशा मुलाणी हिने 64.75 टक्के गुण मिळवून एम.ए. हिंदी विषयाच्या विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

 

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबुराव(भाऊ) गायकवाड, उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.पी.सी.झपके सचिव मा.श्री. उदयबापू घोंगडे, खजिनदार मा.श्री.नागेश गुळमिरे, सदस्य मा.श्री.म.सि.झिरपे, मा.श्री.रावसाहेब ताठे, मा.श्री.शामराव लांडगे, मा.श्री.सुरेश फुले, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, संस्था पदाधिकारी व सदस्य यांनी केला. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button