…….अन्यथा डोक्यावर मैलामिश्रित सांडपाणी घेवून नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसणार
सांगोला(प्रतिनिधी):- रस्ता पूर्ववत करून सोयीसुविधा उपलब्ध करून मिळाव्यात अन्यथा 26 जानेवारी रोजी डोक्यावर मैलामिश्रित सांडपाणी घेवून नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सांगोला शहरातील जि.प.प्रा. शाळा शिवाजीनगर शाळेच्या पश्चिमेकडील रहिवाशी नागरीकांकडून मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात आमच्या हक्काच्या आणि पूर्व वहिवाटीचा रस्ता जेसीबी सहाय्याने आमचा पूर्वी पासूनचा रस्ता पोल उकरून तार जाळी मारून रस्ता बंद केलेला असून सदरची घटना 14 जानेवारी 2025 रोजी घडलेली असून सदरच्या घटनेची माहिती याबाबत न्याय मिळण्यासाठी लिखित स्वरूपात मा. मुख्याधिकारी साो नगरपरिषद सांगोला यांच्याकडे व मा. पोलिस निरिक्षक साो सांगोला यांना 14 व 15 जानेवारी 2025 रोजी समक्ष भेटून रितसर दिलेली आहे. तरी याबाबत संबंधीत अधिकार्यांनी न्याय देण्याच्या दृष्टीने कोणतीही कारवाई केली नसल्या कारणाने सर्व नागरीकांना दि.26 जानेवारी 2025 रोजी प्रजाकसत्ताक दिनादिवाशी आम्हास नगरपरिषदेकडून रस्ता व भुयारी गटार, व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन यांची सोय केली नसल्याने आम्ही सर्व प्लॉटधारक उपोषणकर्ते डोक्यावर मैलामिश्रित सांडपाणी घेवून नगरपालिकेच्या समोर उपोषणास बसणार आहोत तरी तातडीने 25 जानेवारी 2025 पर्यंत आम्हाला न्याय द्यावा हि विनंती. अन्यया या उपोषणाशिवाय आम्हाला दुसरा मार्ग दिसत नाही.
निवेदनाव्दारे जनार्धन लवटे (मा. सैनिक), हिराबाई लवटे, नानासो डोईफोडे, मोहन कुरणे, सुरेश पाटील, सुब्राव जाधव, नर्मदा जाधव, मल्हारी वाघमोडे, विलास बिले, हाफिजा मुजावर, ललिता गवळी, स्वाती विजय मगर यांच्या स्वाक्षरी व अंगठे आहेत.