महाराष्ट्र

तालुक्यात शुध्द पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी सतर्क रहा – बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी

पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रिया व पाण्याच्या विविध तपासण्या बाबत पुरेसे ज्ञान सर्वांना होणे साठी पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिका तयार करणेत आली आहे. माहिती पुस्तिका कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरणार आहे. तालुक्यातील शुध्द पाणी व स्वच्छ अंगणवाडी,शाळा साठी सतर्क रहा असे आवाहन पंचायत समिती सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले.

पंचायत समिती सांगोला पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने बचतभवन येथे तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.कार्यशाळेसाठी पंचायत अधिकारी,आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेवक,वैद्यकीय अधिकारी ऊपस्थित होते या प्रसंगी जल जीवन मिशन चे सेनापतीकेदार, उपअभियंता , तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अविनाश खांडेकर, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, विस्तार अधिकारीआरोग्य एम एस सावंत , विस्तार अधिकारी पंचायत देवराव पुकळे , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती साळे,डॉक्टर कल्याणी सरवदे, डाॅक्टर संदीप देवकते, डाॅक्टर कल्याण ढाळे प्रमुख उपस्थित होते. पाणी गुणवत्ता मध्ये तालुक्यातील प्रा.आ.केंद्र महुद यांनी उत्कृष्ठ काम केले बद्दल डॉक्टर कल्याण ढाळे,राहुल देवडकर, प्रकाश ऐवळे,विजय दंदाडे, मनोज जाधव व पंचायत अधिकारी बाळु शिंदे यांचा सांगोला गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी बीडीओ यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्राफी देऊन गौरव करणेत आला. पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बीडीओ यांच्या हस्ते करणेत आले. प्रारंभी बीडीओ यांचे हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.

बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी पुढे म्हणाले, पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शुध्द पाणी व स्वच्छ परिसरा साठी सजग असले पाहिजे. पाण्याची नियमित तपासणी व्हायला हवी. लोकांना समजावून सांगा. सांडपाण्या साठी शौषखड्डे घ्या. शुध्द पाण्या बरोबर परिसर स्वच्छता महत्वाची आहे. जलशुद्धीकरण करण्यासाठी जलसुरक्षकाची नेमणूक केलेली आहे म्हणजे अतिशय महत्त्वाची जबाबदारी ही जलसुरक्षकाला दिलेली आहे. या जबाबदारी पार पाडत असताना ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत कार्यरत असलेल्या गावातील पाच महिला यांना पाणी शुद्धीकरणाबाबतचे संपूर्ण ज्ञान असणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांना पाणी पुरवठा अशुद्ध झाला तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे जलशुद्धीकरण करणे महत्वाचे आहे.

पाण्याचे नियमित शुद्धीकरण, टी. सी. एल. हाताळणी, ठेवण्याची पद्धत ओ.टी. चाचणी, पाण्याच्या विविध तपासण्या (भौतिक, रासायनिक आणि जैविक), पाणी नमुने घेण्याची पद्धत, हातपंप आणि विहीर यांचे पाणी शुद्धीकरण याबाबत परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न या पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षणात माहिती देण्यात आली आहे.

 

प्रास्ताविक विस्तार अधिकारीआरोग्य मिलिंद सावंत यांनी केले.तालुक्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण विषयक काम करणाऱ्या सर्व सहभागी घटकांना ज्ञान मिळावे, हे ध्येय ठेवूनच तालुक्यातील पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण पुस्तिका संपूर्ण परिपूर्ण माहितीसह देताना सार्थ अभिमान असल्याचे मिलिंद सावंत यांनी सांगितले. पाणी शुद्धीकरण करण्याच्या पवित्र कामाचा वसा घ्यावा. असेही मिलिंद सावंत यांनी सांगितले. पिण्याचे पाण्याचे नियमित शुध्दीकरण व निर्जंतुकीकरण करणे साठी टीसीएल वापरणे बाबत, स्त्रोतांची माहिती व नोंदी ठेवणे योजनांची देखभाल दुरुस्ती करणेसाठी नियोजन करणेसाठी नियोजन करणेची आवश्यकता असल्याचे मिलिंद सावंत यांनी ठामपणे सांगितले आहे पाणी गुणवत्ता सल्लागार सागर कोळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. अविनाश खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

कनिष्ठ प्रशासन अधिकारी बंडु नागणे,महेश जाधव,अनिकेत जगताप बीआरसी, सावित्री गायकवाड सीआरसी ऊपस्थित होते
सुत्रसचालन विस्तार अधिकारीआरोग्य मिलिंद सावंत यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र महुद वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन बीडीओ उमेशचंद्र कुलकर्णी,वसंत फुले,सेनापती केदार, डॉक्टर अविनाश खांडेकर यांचे हस्ते गौरव करणेत आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button