सांगोला विद्यामंदिरच्या एसएससी-1998 बॅचकडून आर्थिक मदत

सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एसएससी बॅच-1998 मधील मित्रमंडळींकडून सांगोल्यातील तानाजी किरगत यांच्या किडनीसाठी रोख रुपये 23,228/- इतकी मदत करण्यात आली.
सांगोल्यातील किराणा दुकानदार तानाजी किरगत यांच्या दोन्ही किडन्या अकार्यक्षम झाल्या असून त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अश्विनी तानाजी किरगत यांची किडनी त्यांना ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे. सदर शस्त्रक्रिया सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना, पुणे या ठिकाणी नियोजित असून अपेक्षित खर्च रुपये 7,50,000/- इतका आहे.
किरगत कुटुंबीयांची ही अडचण समजल्यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून 1998 साली एसएससी परीक्षा उत्तीर्ण होत बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी एकत्रित येऊन त्यांना “एक हात मदतीचा” देण्याचे ठरवले, यातूनच ग्रुप सदस्यांनी पुढाकार घेत ग्रुपमधील प्रत्येकाला आवाहन करत अल्पशः कालावधीत रुपये 23,228/- इतकी रक्कम जमा केली व किरगत कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
26 वर्षानंतर एकत्रित आलेल्या मित्रमंडळींनी विद्यामंदिरमध्ये झालेल्या संस्कारातून अडचणीत आलेल्या पती-पत्नीला मदतीचा हात देण्यात खारीचा वाटा उचलता याबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढेही ग्रुपमधील किंवा ग्रुप बाहेरील गरजवंतांना मदतीची आश्वासक भावना यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले.
किरगत कुटुंबीयांनी ग्रुप मधील सर्व सदस्यांचे आभार मानत इतर दानशूर व्यक्तींनी सुद्धा मदत करावयाची इच्छा असल्यास सौ.अश्विनी किरगत यांच्या 9604969505 या फोन पे क्रमांकावर आपली मदत पाठवून सहकार्याचे आवाहन केले.