न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज सांगोला मध्ये काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न..

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावा या उद्देशाने 21 जानेवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मधील क्रॅश कोर्स हॉलमध्ये देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे उपप्राचार्य प्रा संतोष जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा चंद्रकांत इंगळे होते.
याप्रसंगी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्था सदस्य प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा संतोष राजगुरू, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सौ. इंदिरा येडगे, प्रा. सौ.जयश्री पाटील, प्रा सौ जुलेखा मुलाणी, इंग्रजी विभागाच्या प्रा.श्रीमती चंद्रप्रभा माने, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीपर आयोजित काव्य वाचन स्पर्धेमध्ये जे न देखे रवी.. ते देखे कवी.. ” या उक्तीप्रमाणे इयत्ता अकरावी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत आपल्या कवितातून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे इलेक्ट्रिकल विभागाचे प्रा चंद्रकांत इंगळे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून कवितांची पुष्पवृष्टी केली. या विविध कवितांपैकी लिवा मास्तर लिवा तुमचंच नाव लिवा… या कवितेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. तसेच मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा इंदिरा येडगे, प्रा अरुण बेहेरे यांनीही उत्कृष्ट पद्धतीने कवितेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देशमुख सर यांनी तर आभार प्रा. आलदर सर यांनी केले. एका अभिवाचन स्पर्धेसाठी इंग्रजी विभागाचे प्रा चांगदेव माळी, मराठी विभागाचे प्रा अरुण बेहेरे व प्रा.सौ कुसुम जानकर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.