महाराष्ट्र

सांगोला रोटरी क्लबच्या सदस्याची शेगाव कॉन्फरन्स संपन्न..

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ यांनी आयोजित केलेली २०२४-२०२५ या रोटरी वर्षाची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स श्री संत गजानन महाराज शेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली. हि कॉन्फरन्स रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रंतपाल रो.डॉ.सुरेश साबू व फर्स्ट लेडी रो. निर्मला साबू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या शेगाव कॉन्फरन्स साठी सांगोला क्लबमधून १६ रोटरी सदस्य जोडी व २ सिंगल सदस्य असे एकूण ३४ सदस्य सहभागी झाले होते. हि कॉन्फरन्स दिनांक १७ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत संपन्न झाली.अतिशय उत्कृष्ट नियोजन,उत्कृष्ट मेजवानी, उत्कृष्ट राहण्याची सोय तसेच पतंग महोत्सव साजरा केला.सदर कॉन्फरन्स साठी रो.श्रीनिवास मूर्ती हे प्रतिनिधी म्हणून हजर होते.
कॉन्फरन्ससाठी वक्ते म्हणून रो. रविशंकर डाकोजू,रो.डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मधुबाला चिंचळकर,रा,बी.के.सुनिता दीदी यांनी उपस्थितना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात संजय कळमकर व गणेश शिंदे या दोघांनी उपस्थिताना मनमुराद हसवले व आनंद दिला.अशी ही शेगाव कॉन्फरन्स लोणार सरोवर, सिंदखेड राजा,मेहकर,औंढ्या नागनाथ अशी ठिकाणी पाहत सर्वांनी आनंदाने साजरी केली.या कार्यक्रमांमध्ये सांगोला क्लब यांना सहभाग नोंदणी,उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट युवा RYLA कार्यक्रम,यासाठी सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button