सावे:-मकर संक्रांतीच्या निमित्ताने हेरिटेज फुड्स लिमिटेड आंधळगाव व पशुधन दूध संकलन केंद्र सावे यांच्या वतीने जंत निर्मूलन सामूहिक कार्यक्रम सांगोला तालुक्यातील सावे या ठिकाणी घेण्यात आला.
यावेळी आंधळगाव प्लांटचे इन्चार्ज प्रवीण सूर्यवंशी पशुधन दूध संकलन केंद्राचे चेअरमन राहुल मासाळ तसेच गावातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते यावेळी उपस्थित पशुपालकांना जंत निर्मूलनाच्या गोळ्या देण्यात आल्या.
जंत हे जनावरांच्या पोटातील रक्तस्त्राव अन्नपदार्थ यावर जगत असतात जंत वासरांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात त्यामुळे वासरांना शरीर वाढीसाठी पोषक घटक मिळत नाहीत. मोठ्या जनावरांना तीन महिन्याच्या अंतराने आणि वासरांना दर महिन्याला त्यांचे वय सहा महिने होईपर्यंत जंत निर्मूलन करावे. प्रभावी जंत निर्मूलनासाठी गोठ्यातील सर्व जनावरांचे जंत निर्मूलन एकाच वेळी करावे असे आवाहन हेरिटेज फूड शाखा आंधळगाव चे मॅनेजर प्रवीण सूर्यवंशी यांनी केले आहे.