महाराष्ट्र
सांगोला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ची ज्ञानेश्वर कोळसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये भेट

सोनंद येथील ज्ञानेश्वर कोळसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये सांगोला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या देशव्यापी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे त्याची माहिती देण्यासाठी भेट दिली.
सदर प्रसंगी सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुनील कोरे,श्री मेखले, श्री मदने,श्री धनराज माने,श्री अवधूत भिंगे, संस्था अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील, दिग्विजय कोळसे पाटील प्राचार्य श्री रोहित निकम इत्यादी उपस्थित होते. श्री सुनील कोरे यांनी जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या फार्मसी क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती सांगितली.तसेच सदर वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व याचाच एक भाग म्हणून दि.24 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात एकच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान केला. श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी कॉलेज मधून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी रक्तदान शिबिरात सहभागी होतील अशी ग्वाही दिली.