महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत शपथ ग्रहण..

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत.. *”मी शपथ घेतो की, फेब्रुवारी मार्च 2025 च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब व विचार करणार नाही. परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणाव विरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आई-वडिलांचे गुरुजनांचे व शाळेचे नाव उज्वल करेन… जय हिंद. “* अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, संस्था सदस्य प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, किमान कौशल्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा चंद्रकांत इंगळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा, मिलिंद पवार, मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा इंदिरा येडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. संतोष राजगुरू, प्रा.जुलेखा मुलाणी, मराठी विभागाच्या प्राध्यापिका सौ. कुसुम जानकर, सौ जयश्री केदार, इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती चंद्रप्रभा माने, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय देशमुख सर यांनी तर आभार प्रा. तानाजी आलदर सर यांनी केले.