ऑल इंडिया एनसीसी विभागातर्फे संपूर्ण भारतातील एनसीसी कॅडेट्सच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ऑल इंडिया थलसेना कॅम्प येत्या 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आला असून या कॅम्पमध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या 18 डायरेक्ट्रेटचे एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत.
या कॅम्पमध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून रायफल शूटिंगचे कौशल्य दाखवण्यासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सार्जंट ऋतिक सराटे, कार्पोरल अविराज कदम व लान्स कार्पोरल कोयल मोरे यांची निवड झाली आहे.
एनसीसी सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी आणि थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे विद्यार्थी देश पातळीवरील थलसेना कॅम्पमध्ये निवडण्याचे हे सलग तिसरे वर्ष असून या विद्यार्थ्यांना 38-महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर एम.मुत्ताप्पा, ऑफिसर विक्रम जाधव, सुभेदार मेजर अरुणकुमार ठाकूर, सुभेदार अण्णासाहेब वाघमारे तसेच पीआय स्टाफ मनीष कुमार, सुदाम सर, ब्रिगेडियर मित्रा साहेब यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभले.
एनसीसी कॅडेट्सच्या या यशाबद्दल कॅडेट्स व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.