जीव नावाची गंगा ईश्वर नावाच्या समुद्राला मिळते. ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर

जवळे(प्रशांत चव्हाण) जीव नावाची गंगा नावाची ईश्वर नावाच्या समुद्राला मिळते. कारण देव परमात्म्याने माणसाला जीव नावाची देणगी दिली असून हे देव परमात्म्याचे माणसांवर झालेले उपकार आहेत. देव परमात्म्याचे अखंडपणे रात्रंदिवस नामस्मरण करा तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे मौलिक विचार विचार ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज) यांनी जवळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवात कीर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले जोपर्यंत ब्रह्मरस प्राप्त होत नाही तोपर्यंत विषयाचा त्याग होत नाही. यावेळी संत तुकाराम महाराजांचे वर्णन करताना महाराज म्हणतात नामाच्या छंदाने माझी वाचा अनावर झाली.माझ्या इंद्रियाच्या प्रत्येक नसानसात भगवंताचे नाव भिनले आहे. म्हणून भगवंत परमात्मा आपल्या भक्तांना कधीच दुखत नव्हते.माझे जीवन देव परमात्माच्या चिंतनासाठी ब्रह्मरस झाले आहे. असे सांगत महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना कीर्तनाचा आनंद दिला.कीर्तनामध्ये गायक, मृदंगमणी, टाळकरी, विण्याचे सेवेकरी,चोपदार यांची मोलाची साथ लाभली.
तत्पूर्वी पहाटे काकडा, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन सायंकाळी प्रवचन व हरिपाठ हे कार्यक्रम संपन्न झाले. वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी श्री. चंद्रकांत सुतार,श्री.दीपक चव्हाण,श्री.रमेशअप्पा साळुंखे यांनी परिश्रम घेतले.