महाराष्ट्र
महुदचा स्वच्छता दूत व घड्याळबाबा हरपला.

महुदचा स्वच्छता दूत व घड्याळबाबा हरपला.
भोळसर स्वभावाचा ताजूद्दिन तांबोळी हा आम्ही लहान होतो तेंव्हा पासून जसा असायचा अगदी शेवट पर्यंत तसाच रहायचा.गावात कुठेही कचरा दिसला तर तो लगेच साफ करायचा.पुढारी कोण आहे त्याला माहीती असायचे त्या पुढार्याला जाऊन सांगणार आमच्या पेठेत कचरा गाडी पाठवून द्या।कचरा गाडी गावात आली की ताजू घरोघरी जाऊन सांगायचा तुमचा कचरा बाहेर आणून ठेवा गाडी आलेली आहे.
मुस्लीम समाजाचा जरी असला तरी मारूती,गणपती ,दत्त,देवी या हिंदू देवतांबद्दलही ताजूला आकर्षण असायचे.
गावातल्या प्रत्येकाचा ताजू आवडता होता.नेहमी विनोदी व हसरा चेहरा आता काळाच्या पडद्याआड झाला.
घड्याळबाबा ,स्वच्छता दूत हरपला.
भावपूर्ण श्रद्धांजली