स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थी चौफेर विचार करायला शिकतात-बालसाहित्यिक फारूक काझी; भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळा व पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न.

स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थी चौफेर विचार करायला शिकतात तसेच स्वतंत्र विचार करायलाही शिकतात असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक श्री.फारूक काझी यांनी केले. विद्यार्थी विकास फौंडेशनद्वारा आयोजित भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी श्री.सुयोग नवले व दिगंबर गायकवाड होते.यावेळी विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.दिपक बंदरे,इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाच्या अध्यक्षा सौ.सविता लाटणे, आदर्श शिक्षक व लेखक श्री.संजय काळे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना काझी सर म्हणाले की,अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी छंद जोपासले पाहिजेत.या यशाबरोबरच विद्यार्थी चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे व आनंदी रहावे असे विचार व्यक्त केले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना विस्तार अधिकारी नवले साहेब यांनी विद्यार्थ्यांना जीवनात एक चांगला माणूस म्हणून यशस्वी होता आले पाहिजे. स्वतः वर विश्वास असला पाहिजे व या आत्मविश्वासाच्या बळावरती विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे विचार मांडले यावेळी चेअरमन दिपक बंदरे, विस्तार अधिकारी श्री.गायकवाड सौ. सविता लाटणे, श्री.संजय काळे,डॉ.कैलास माळी यांनी विद्यार्थी विकास फौंडेशन राबवत असलेल्या या परीक्षेबद्दल त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षकांना दीपस्तंभ प्रेरणादायी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये श्रीमती वंदना दत्तात्रय सुरवसे जि.प.प्रा.केंद्र शाळा कमलापूर. श्रीमती शितल ज्ञानेश्वर चव्हाण,जि.प.प्रा.केंद्र शाळा महुद बु|l श्रीमती बेबीनंदा मच्छिंद्र गेजगे,जि. प. प्रा. शाळा शिंदेवस्ती वाटंबरे, शबनम खुदबुद्दीन तांबोळी,जि.प. शाळा गोडसेवाडी, केंद्र कमलापूर, श्री.अमोल मोहन कांबळे,मॉडर्न हायस्कूल महुद बु||, आस्मा बालेचांद शेख,फिनिक्स इंग्लिश स्कूल महुद बु||
यांना पुरस्कार देण्यात आले. शाल, ट्रॉफी प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिरुप परीक्षेचे तालुका समन्वयक श्री. तानाजी गेजगे व सौ. रूक्मिणी गेजगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कु.पल्लवी थोरात, श्री. संतोष बेहेरे, प्रशांत बुरांडे, अजित मोरे, युवराज केंगार,अनुपमा पाटणे, दिपाली बसवदे ,विकास पारसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संगमेश्वर घोंगडे यांनी केले.