*फॅबटेक मध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाची यशस्वी सांगता*

सांगोला : विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला होता . राज्यभरात १ ते २५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता . या उपक्रमाचा उद्देश वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयांशी जोडणे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणे आहे. हा उपक्रम ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवला जात असून यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.
वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाची यशस्वी सांगता फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च येथील मध्यवर्ती ग्रंथालय विभागांतर्गत मोठ्या उत्साहात झाली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी वाचनाचा संकल्प घेतला आणि वाचनाशी आपले नाते दृढ केले.
या मोहिमेअंतर्गत विविध सामूहिक वाचन , वाचन स्पर्धा, लेखक संवाद सत्रे, वाचन कार्यशाळा, आणि पुस्तक प्रदर्शनांचे,ग्रंथ दिंडी , पुस्तक परीक्षण आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये पुस्तक परीक्षण या स्पर्धेमध्ये प्रा.बिरा वगरे , प्रा. विजय पाटील ,प्रा.शाम कोळेकर,प्रा. प्रवीण वेळापूरकर, प्रा.दुर्गा पाटील, प्रा. संगीता खंडागळे, अनुज शिंदे (विद्यार्थी ), कावळे सानिका ( विद्यार्थी ) यांना उत्कृष्ट पुस्तक परीक्षण म्हणून निवड झाली ,यांना प्रोत्साहनपर २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या हस्ते तसेच मध्यवर्ती ग्रंथालय विभागामार्फत प्रमाणपत्र आणि मराठी पुस्तक भेट देण्यात आले.
या वेळी बोलताना फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आपल्या वाचन कौशल्यांचा विकास करणे आणि विविध पुस्तकांचा अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. वाचन केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नाही, तर ते विचारांना प्रगल्भ बनवून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वाचे ठरते. वाचनाच्या माध्यमातून नवीन कल्पना, दृष्टिकोन, आणि विचारसरणी यांची ओळख होते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू समृद्ध होतात.
फॅबटेक संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे म्हणाले कि ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम वाचनसंस्कृतीला बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल, ज्यामुळे त्यांचा ज्ञानाचा आवाका वाढेल आणि त्यांना नव्या क्षितिजांचा शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. वाचनाची सवय फक्त शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे, तर सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे वाचनाच्या या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याने आपले योगदान द्यावे आणि वाचन संस्कृतीला अधिक गतिमान बनवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या उपप्राचार्या. डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकाच्या सक्रिय सहभागामुळे या उपक्रमाला यश मिळाले आणि वाचन संस्कृती वाढीस लागेल, असे सांगितले.
हा कार्यक्रम फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी डॉ सुरज रूपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फॅबटेक इंजिनिअरिंगच्या उप प्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, फॅबटेक फार्मची चे प्राचार्य डॉ.संजय बैस, फॅबटेक पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले , फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज प्रा. सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर , फॅबटेक इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.