महाराष्ट्र
सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.किरण महेश राजमाने हिची खेलो इंडिया साठी निवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 10 मीटर रायफल शूटिंग महिला संघाने पंजाब विद्यापीठ चंदिगड येथे पार पडलेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल सांगोला महाविद्यालय सांगोला बी.एस्सी. ची विद्यार्थिनी कु. किरण महेश राजमाने हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्षप्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री.नागेश गुळमिरे, सचिव श्री.ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे व संस्था सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. जगदीश चेडे व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.