फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न

सांगोला : मन गंगेसारखे पवित्र व वाणी उसासारखी गोड असेल तर व्यक्तिमत्व
खुलून दिसते असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक श्री महादेव घोंगडे यांनी
केले . सांगोला येथील फॅबटेक पॉलिटेक्नीक कॉलेज ने आयोजित केलेल्या प्रथम
वर्ष डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नितिमूल्य विषयावर मार्गदर्शन करताना
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
या वेळी व्यासपीठावर पॉलिटेक्नीक चे
प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले ,प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख प्रा. अनिल
वाघमोडे उपस्थित होते . पुढे बोलताना श्री.घोंगडे म्हणाले की कौशल्य व
प्रामाणिक पणा हा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे .त्यामुळे ज्ञानप्राप्तीला
गुणवत्तेबरोबर नितिमूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थी सन्मानास प्राप्त
होतील असे त्यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचल व आभार
प्रदर्शन प्रा.नागेश लेंगरे यांनी केले .यावेळी विद्यार्थी व शिक्षक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन
मा.श्री.भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी
संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे ,यांच्या
मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.