सांगोला महाविद्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

येथील सांगोला महाविद्यालयामध्ये प्रजासत्त्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी एन.सी.सी.छात्र आणि भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे हे उपस्थित होते, महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला सलामी दिली.
26 जानेवारी 2025 रोजी आपल्या देशाचा 76 वा प्रजासत्त्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. सांगोला महाविद्यालयामध्येही प्रजासत्त्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपकेसर, सचिव ॲड. उदयबापू घोंगडे, संस्थेचे सदस्य म.सि.झिरपे, श्री. सु. ग. फुले, श्री. चंद्रशेखर अंकलगी, श्री. सु. ग. उकळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, प्राध्यापक डॉ. बी.एच.कुलकर्णी, प्रा. बी. के. लोंढे, प्रा. एस. व्ही. साळुंखे, श्री. एन.एस.सुरवसे, श्री. अनिल साखरे, श्री. मधुकर कसबे, श्री. अशोक खडतरे, श्री. रमेश बुंजकर तसेच श्री.अच्युत फुले, श्री. महेश गुरव, यांचेसह संस्थापदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.डॉ.विजयकुमार गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, प्रा.संतोष कांबळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



