सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेट च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

. सांगोला शहरासह सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यावसायिकांचा आर्थिक कणा ठरलेली तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असलेली सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला शहर व परिसरातील लाडक्या बहिणींसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. सांगोला शहरातील नेहरू चौकामध्ये एल के पी मल्टीस्टेटच्या शाखेसमोर संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी महिला वर्गाची प्रचंड गर्दी उसळली होती.
यावेळी मंचावर डॉ. स्नेहल भोसले , डॉ संगीता पिसे , लेखापरीक्षक सौ उमा उंटवाले, मानदूतच्या सौ गौरीताई मस्के , सौ दिपाली कोळसे पाटील , सौ पल्लवी थोरात, ज्येष्ठ मार्गदर्शिका सौ शालन इंगवले, लता गोडसे, सौ शुभांगी लिगाडे, सौ विद्या जाधव इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. शेकडो कुशल आणि एकनिष्ठ कर्मचारी वृंद, हजारो सभासद आणि लाखो समाधानी ग्राहकांच्या उदंड विश्वासाच्या साथीने वाटचाल करत असलेल्या या संस्था सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
ठेविदारांच्या ठेवीची सुरक्षा व ग्राहकांचे हित लक्षात घेत सभासद महिला आणि अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या व ग्राहकांच्या आर्थिक गरजा भागवीणे एवढ्या पुरतेच मर्यादित स्वरूप न ठेवता या संस्थांच्या वतीने सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. एक तोळा सोन्याला सुमारे 70 हजार रुपयांचे कर्ज देणारी अशी ही एकमेव संस्था असून आरटीजीएस, एन इ एफ टी सारख्या कितीतरी प्रकारच्या बँकिंग सुविधा या संस्थांच्या वतीने विनामूल्य पुरविण्यात येतात. या संस्थेच्या वतीने सर्व आवश्यक माहितींनी युक्त असलेल्या दिनदर्शिकेसह अत्यंत उपयुक्त आणि आकर्षक अशा डायरीचेही प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
या हळदी कुंकू समारंभाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी केले. यावेळी मंचावरील उपस्थित मान्यवर महिलांनी मार्गदर्शन करताना सूर्योदयच्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अनेक व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केल्याबद्दल अनिलभाऊ इंगवले, जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी यांचे सह सूर्योदय उद्योग समूहाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक महिलांनी उखाणे वगैरे सारख्या उपक्रमात भाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला .
यावेळी उपस्थित सर्व महिलांना तिळगुळांबरोबरच ‘संक्रातीचा वाण’ म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अर्चना इंगवले, सौ ज्योती भगत,सौ सुरेखा लवटे व सौ मीनाक्षी दिघे यांचे सह संस्थेच्या कर्मचारी वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.