महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये बुधवार दि.29/1/2025 रोजी महिला पालकांसाठी  हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल भोसले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. शुभांगी पवार,पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर तसेच सर्व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहल भोसले आपल्या मनोगतात बोलताना म्हणाल्या की,महिलांनी आपली संस्कृती व संस्कार जपले पाहिजेत. पारंपरिक सण, उत्सव या माध्यमातून महिलांनी आपली ओळख टिकवली पाहिजे व हे सण उत्सव साजरे केले पाहिजेत. तसेच महिलांनी आपला आहार संतुलित ठेवावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती शिल्पा ढाळे यांनी उपस्थित महिला पालकांना येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यानिमित्ताने महिलांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला यामधून विजेत्यास विद्यालयाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये सौ. योगिता निमगिरे या विजेत्या ठरल्या तसेच कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळेत ज्या महिला पालक उपस्थित राहतील त्यांनाही बक्षीस ठेवण्यात आले होते यामध्ये मृणाली बाबर यांना हे बक्षीस देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांच्यासह उत्सव विभाग प्रमुख अनुपमा गुळमिरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button