महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात निर्भया पथकाकडून मार्गदर्शन शिबीर संपन्न

सांगोला :उपविभागीय पोलिस कार्यालय मंगळवेढा अंतर्गत निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कविता सावंत, अमोल राऊत यांनी सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी मार्गदर्शक केले. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी पवार उपस्थित होत्या.
यावेळी पोलीस कर्मचारी अमोल राऊत यांनी निर्भया पथकाचे कार्य विद्यार्थिनींना समजावून सांगितले. शाळेत, आपल्या परिसरात जर आपणास जाणून बुजून कोण त्रास देत असेल तर त्याची कल्पना आपल्या शाळेतील शिक्षिका, पालकांना अथवा पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन केले.
तसेच शाळेतील अडचणी असतील तर मुख्याध्यापिका यांना सांगावे अथवा शाळेतील तक्रार पेटीत तक्रार द्यावी, असे सांगून महिला व मुलींसाठी रात्री अपरात्री पोलिसांची मदत लागली तर 112 हा मोफत क्रमांक डायल करून मदत घेण्याचे आवाहन केले. यावेळी “बॅड टच गुड टच”. असे स्पर्श समजावून सांगितले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नानासाहेब घाडगे यांनी केले तर आभार जगन्नाथ साठे यांनी मानले.