महाराष्ट्र
श्रीमती वर्षा लक्ष्मण स्वामी यांचा देहदान संकल्प

नाझरे ता. सांगोला येथील श्रीमती वर्षा लक्ष्मण स्वामी, स्वर्गीय ग्रंथपाल लक्ष्मण स्वामी यांच्या अर्धांगिनी यांनी देहदान संकल्प फॉर्म भरून आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिम कर यांचे कडे देण्यात आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सदर प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक शिवया स्वामी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, सेवानिवृत्त हवालदार माणिक स्वामी, पत्रकार रविराज शेटे, शिक्षिका नयना पाटील, लता पाटील, शंकरराव स्वामी, श्रीमती सुवर्णा स्वामी इत्यादी उपस्थित होते.