महाराष्ट्र

वाकी (घेरडी) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1चे पशुगणनेचे 49टक्के काम पूर्ण…

जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. आता या गणनेत भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्याने त्यांचीही गणना केली जाणार आहे.मोबाइल ॲपचा वापर करून या गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. पशुगणनेत आतापर्यंत शेतकऱ्यांकडील पाळीव पशुंचाच विचार केला जात होता; मात्र गेल्या काही काळात भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्या जनावरांची नोंद झाली तर आकडेवारीमध्ये पारदर्शकता येईल तसेच पुढे योग्य ते धोरण राबवणे शक्य होणार आहे. त्यानुसार या पशुगणनेत पाळीव प्राण्यांसोबत भटक्या प्राण्यांचीही जाती, उपजातींची, लिंग, वयाची नोंद केली जात आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. दुग्ध उत्पादक शेतकरी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे.शेतकरी, पशुपालकांकडील पाळीव पशुधन, उद्योग, संस्था, संघटनांनी पाळलेल्या गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशूंसह मेंढी, शेळी, वराह, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती तसेच कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, व इमू यांसारखे कुक्कुट पक्षी याव्यतिरिक्त भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय यांचीही माहिती संकलित करण्यात येत आहे.
पाच वर्षांनी होत आहे पशुगणनाआतापर्यंत एकूण २० वेळा पशुगणना करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पशुगणना करण्यात आली होती. आता २५ नोव्हेंबरपासून 2024 पासून 21व्या पशुगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून ती 28फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.  ग्रामीण भागामध्ये ३००० कुटुंबामध्ये एक प्रगणक नेमला आहे. आणि ५ प्रगणकामागे १ पर्यवेक्षक नेमला आहे.
         या उपकेंद्राच्या अंतर्गत 3गावे येतात यामध्ये आलेगाव,वाकी ,वाणीचिंचाळे या गावाचा समावेश होत आहे.यामध्ये पशुपालन हा व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांची संख्या आहे.याभागातील 49टक्के पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे.
——————————————-
पशुपालकांना आम्ही सेवा देण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहत आहे.तसेच सर्व जनावरांना लसीकरण मोहीम पूर्ण केली आहे.तसेच विविध पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ पशुपालकांनी घ्यावा.
डाॅ शुभांगी वाघमारे.पशुवैद्यकीय अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button