ग्रंथालय संघाचे वतीने ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा सत्कार संपन्न

सांगोला येथील ऋषिकेश बुक डिलर येथे राज्य ग्रंथालय संघावर कार्याध्यक्ष पदावर विराजमान झालेले ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी सांगोला येथील कराड अर्बन बँक चे व्यवस्थापक बसवेश्वर चेणगे पुढे म्हणाले ग्रंथालय चळवळ उभा करण्यासाठी ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा मी गौरव करून त्यांना शुभेच्छा देतो. ग्रंथालय चळवळीत सहभागी असणारे ग्रंथप्रेमी माणसावर देखील अतूट प्रेम करत आहेत याचे मला कौतुक आहे. वाचन संस्कृती टिकली पाहिजे तालुक्यामध्ये ग्रंथालयाने संमेलने भरून ज्या ठिकाणी ग्रंथालय नाहीत त्या ठिकाणी ती उभा केली पाहिजेत लेखकांच्या भेटी मुलं मुलांना घडवले तर ग्रंथालय समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी भाषेवर प्रेम केले पाहिजे यासाठी ठिकठिकाणी चांगल्या दर्जाची ग्रंथालय निर्माण झाली पाहिजेत. ग्रंथालय चळवळीचे समाजाशी नाते जोडले तर ग्रंथालय चळवळ भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण सहकार्य करण्यासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी विठ्ठल वलेकर , हरिदास घोडके, संजय सरगर ‘डॉ. शिवराज भोसले, सुहास कुलकर्णी इत्यादी मान्यवर आणि आपले अनमोल विचार व्यक्त केले यावेळी सत्कारमूर्ती ग्रंथमिञ गुलाबराव पाटील वडिलांच्या कार्याचा आदर्श घेऊन जात पक्ष न मानता निस्वार्थीपणे ग्रंथालय चळवळीसाठी मी काम करत आहे .प्रामाणिकपणे निष्ठेने काम केले तर प्रत्येक कार्यकर्त्याला न मागता पदे निश्चित मिळतील ग्रंथालय तालुक्यामध्ये सक्षमपणे चालवून लोकांना सेवा द्या. चांगली सेवा द्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सत्कारमूर्ती गुलाबराव पाटील उपस्थित पाहुणेसोबत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.