फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला आणि विरचो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्यात सामंजस्य करार

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला आणि विरचो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) नुकताच करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान, इंटर्नशिप तसेच उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या करारावर विरचो बायोटेकचे सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. रघु रामी रेड्डी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अद्ययावत कौशल्ये आत्मसात करण्याची तसेच वास्तविक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या सामंजस्य करारामुळे फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधींचे द्वार उघडणार असून औषधनिर्मिती क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्यांमध्ये वाढ होणार आहे. कॉलेजच्या वतीने हा करार हा विद्यार्थी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.