महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. फॅबटेक पब्लिक स्कूल हे स्त्रीशक्ती व स्त्री संस्कृतीचा वारसा नेहमी जपत असते. महिलांच्या विचारांचा जागर करत स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.
संक्रांतीनिमित्त महिला पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ सुरेखा रुपनर डॉ. सुरज रूपनर ,प्राचार्य प्रा .श्री सिकंदर पाटील ए.ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे उपस्थित होते . संक्रांत सणाची पौराणिक कथा , वान देण्याची कथा तसेच भौगोलिक कारण या सणा पाठीमागील संस्कृतीचा वारसा प्रा.सौ विद्या नरूटे यांनी उपस्थित महिलांना सांगितला. यानंतर महिलांनी उत्स्फूर्त उखाणे घेतले. यानंतर स्कूलने महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक फनी गेम्स ठेवले होते. यात बॅलन्स बॉल , संगीत खुर्ची, बॉटल्स गेम्स, रनिंग इ. स्पर्धा घेण्यात आल्या. यानंतर महिला शिक्षकांनी उपस्थित महिला पालकांना संक्रांतीचे वाण देऊन तिळगुळाचे वाटप केले.
हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी संस्थेची चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,प्राचार्य प्रा .श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु.रेश्मा तोडकर यांनी केले तर आभार प्रा. सौ. नयन देशमुख यांनी व्यक्त केले . याप्रसंगी सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत्या.