फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘फार्मसीआ’ फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न
सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या कार्यक्रमासाठी डॉ. अविनाश खांडेकर, सांगोला तालुका आरोग्य अधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच आरोग्यविषयक माहिती देत त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस अकॅडेमिक डीन डॉ. सर्फराज काझी वर्गशिक्षक डॉ. शिरीष नागणसूरकर व प्रो. अमोल पोरे हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना कॉलेजचे नियम आणि करिअर बद्दल मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित केले.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख सांगितली. त्यांच्यासाठी वेगवेगळे फनी गेम्स, गीत, नृत्य व टास्कचे नियोजन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमधून मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली. मिस फ्रेशर कु. साक्षी देवकते व मिस्टर फ्रेशर कु. चैतन्य औटी यांची निवड करण्यात आली
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडेमिक डीन डॉ. सर्फराज काझी डॉ. सुरेश नागणसूरकर प्रो. अमोल पोरे डॉ. योगेश राऊत प्रो. स्वाती माने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.