सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा जयहिंद नागरी पतसंस्था, रेवनिल ब्लड बँक, एस.वाय.एंटरप्रायझेस व यशराजे पॅरामेडीकल कॉलेजचे चेअरमन सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त एस.वाय. फौंडेशनच्या वतीने मूकबधिर शाळा आणि ग्रामीण रुग्णालयात खाऊ वाटप व स्वच्छता मोहीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी, दिव्यांग व्यक्तींना एक लाख रुपयांचा अपघाती विमा आणि 5 नोव्हेंबर रोजी शहरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येणार आहे. तसेच जन्मतः पायाने अपंग किंवा अपघातात पाय गमावलेल्या गरजू रुग्णाला कुबडी चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती एस. वाय. युथ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. जयहिंद नागरी पतसंस्था, रेवनिल ब्लड बँक, एस.वाय.एंटरप्रायझेस व यशराजे पॅरामेडीकल कॉलेजचे चेअरमन सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त एस.वाय. फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 5 नोव्हेंबर रोजी स. 10 वा. सांगोला शहरातील मूकबधिर शाळा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खाऊ, फळे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता जयहिंद नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी जन्मतः पायाने अपंग किंवा अपघातात पाय गमावलेल्या गरजू रुग्णाला कुबडीचे वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता रेवनील ब्लड बँक येथे सांगोला तालुक्यातील अंध, अपंग व मूकबधिर व्यक्तींना एक लाख रुपये अपघाती विमा प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवांनी 7875103708 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. बेटी बचाओ, देश बचाओ या अभियाना अंतर्गत सांगोला शहरात 5 नोव्हेंबर 2022 रोजी जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे 5 हजार रुपयांची दामदुप्पट ठेव जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवली जाणार आहे. यासाठी 8888564848 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मुलीच्या जन्माचा दाखला सादर करावा. तसेच दुपारी 12 ते 2 या वेळेत जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेत ज्येष्ठ नागरिकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एस.वाय. युथ फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.