राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात -आमदार शहाजीबापू पाटील
शहाजीबापू पाटील यांचा थेट राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात असून एक मोठा राजकीय भुकंप असल्याचा धक्कादायक खुलासा शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे.
शहाजीबापू पाटील यांनी आता थेट राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
एक धक्कादायक वक्तव्य करुन मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.