महाराष्ट्र
शिवणे विद्यालयात मा. नामदार दत्तात्रेय भरणे मामा यांचा सत्कार संपन्न

शिवणे वार्ताहर शुक्रवार दिनांक 31/01/2025 रोजी क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्यांक व ओकाफ मंत्री मा. नामदार दत्तात्रेय भरणे मामा यांचे 4:00 वाजता शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लेझीम पथकाच्या निनादात आगमन झाले
यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भरणे मामा म्हणाले की पूर्वी मी आपल्या विद्यालयात आलो तेव्हा मी राज्यमंत्री होतो आता मी कॅबिनेट मंत्री आहे पुन्हा मी आपल्या विद्यालयास नक्की भेट देईन आपल्या विद्यालयाच्या क्रीडाविषयक कोणत्याही समस्या निश्चित सोडविण्यास समर्थ आहे विद्यार्थ्यांनी मनामध्ये न्यूनगंड बाळगू नये, कष्ट, मेहनत, चिकाटी व अभ्यासक करून यश मिळवणे गरजेचं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या आयुष्यात मित्र, मैत्रिणी मिळवा आई-वडिलांना आनंद द्या, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा असा संदेश दिला
या कार्यक्रमाला शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बबनराव जानकर, उपाध्यक्ष श्री. प्रकाश वाघमोडे संस्थेचे सर्व सदस्य प्राचार्य विजयकुमार वाघमोडे शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभनतारा मेटकरी यांनी केले तर आभार श्री यशवंत नरळे सर यांनी मांनले.



