धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्यावतीने गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला धनगर समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षा सौ.राणीताई आनंदा माने, उपाध्यक्ष सौ.छायाताई मेटकरी यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यास अस्मिता शिंदे मॅडम उपस्थित होत्या.प्रारंभी अस्मिता शिंदे मॅडम यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुण्या अस्मिता शिंदे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी न डगमगता न घाबरता प्रत्येक परिस्थितीला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सामोरे गेले पाहिजे, महिलांनी सक्षम बनले पाहिजे तसेच ज्या विधवा महिला आहेत त्यांना हळदी कुंकवाचा मान देऊन समाजात त्यांना मानसन्मान दिला पाहिजे तसेच या वातावरणात महिलांनी कोणते पदार्थ खावेत व आपले आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी महिलांना हळदी कुंकवाबद्दलची माहिती दिली.
उपस्थित सर्व महिला सदस्यांना हळदीकुंकू, तिळगुळ व वाण देण्यात आला. तसेच गुलाबपुष्प देऊन नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रुपच्या सर्व सदस्या व इतरही महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सौ.अश्विनी पुजारी यांनी केले.



