महाराष्ट्र

जवळे हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जवळे: सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे- पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अंतरा जाधव हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर प्रशाले मधील विद्यार्थिनींच्या ग्रुपने राष्ट्रगीत,राज्यगीत,ध्वजगीत आणि  संविधान सादर केले. त्यानंतर एनसीसीच्या कॅडेट्सनी शानदार संचलन करून युवानेते यशराजे दीपकराव साळुंखे-पाटील यांना मानवंदना दिली.
त्यानंतर बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.डॉ सुदीप सुभाष चव्हाण(एम.एस.ऑर्थो)यांचेकडून विविध शिष्यवृत्ती प्राप विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस देण्यात येते.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदे कडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंगयश प्राप्त केलेल्या स्कॉलरशिप पात्र विद्यार्थिनींचा तसेच इ.आठवी एन एम एम एस शिष्यवृत्ती तसेच सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यांचा बक्षीस देऊन तसेच विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट व गुलाब पुष्प देऊन मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील युवानेते यशराजे दीपकराव साळुंखे-पाटील व काही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गतवर्षामध्ये प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी 1 लाख 83 हजार 200 रुपये इतकी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल संस्था अध्यक्ष मा.आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील यांनी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या 2024-25 चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 100% लागला असून या परीक्षेसाठी एकूण 34 विद्यार्थी बसले होते.तसेच ते दहावीच्या बोर्ड परीक्षेत वाढीव गुणाचे मानकरी ठरले आहेत.त्यानंतर सन 1997- 98 इयत्ता दहावीच्या बॅचकडून कै.सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे या प्रशालेत 42 इंची फोर के एलइडी सप्रेम भेट देण्यात आली.तसेच मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य  यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर आणि क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री. विजय चडचणकर सर यांचा सत्कार तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य शारदा फुटवेअर चे मालक श्री.भारत सुरवसे यांच्याकडून प्रशालेतील 40 गरीब विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप केल्याबद्दल त्याचबरोबर श्री.राजू इनामदार राज मोबाईल शॉपी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्र जवळे आरोग्य सेवक यांनी दिनांक 31 जानेवारी 2025 ते दिनांक 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या कुष्ठरोग शोध अभियान प्रतिज्ञा जवळे प्रशालेत सादर केली.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मा.आ.दीपक आबा साळुंखे-पाटील म्हणाले गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा समोरच्या विद्यार्थ्यांना मिळावी आपण ही ज्या भविष्यकाळामधील स्पर्धा परीक्षेसाठी आणि शाळेच्या स्पर्धेसाठी उतरावं हा त्या पाठीमाग चा हेतू असतो.या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय मोठा अभिमान आहे की या संस्थेतून आणि वसतिगृहातून शेकडो नाहीतर हजारो विद्यार्थी तयार झाले.महाराष्ट्राच्या प्रमुख  अधिकारी म्हणून अनेक ठिकाणी आयएएस,आयपीएस म्हणून वेगवेगळे अधिकारी या शाळेने आजपर्यंतच्या काळामध्ये या भागाला देण्यात काम केलं आहे.
सदरप्रसंगी सरपंच सौ.सुषमाताई घुले-सरकार,संस्था उपाध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले-सरकार,उपसरपंच श्री.नवाज खलिफा,श्री. साहेबरावदादा पाटील,श्री,बाबासाहेब इमडे,श्री.विलास घुले सर श्री.दत्तात्रय बर्वे,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन)श्री.सुनील आबा साळुंखे,श्री.किसन गायकवाड,श्री.धनेश सुतार,श्री.बाळदादा देशमुख,श्री.आनंदा वाघमारे,श्री.निसार इनामदार,श्री.एनुभाई शेख श्री.शहाजान आतार,श्री.गणेश मोहिते,श्री.पवार मेजर श्री. आगलावे मेजर श्री.चव्हाण मेजर,ग्रा.पं सदस श्री.विजयकुमार तारळकर,श्री.विठ्ठल गयाळी,श्री.निसार शेख,सौ.मीनाताई सुतार श्रीमती निलावती म्हेत्रे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक,तरुण वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,उपमुख्याध्यापक श्री.संजय पौळ सर सर्व शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय लांडगे सर आणि बी.डी शिंदे सर यांनी केले तर आभार श्री.संतोष शेटे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button