महाराष्ट्र
नुतन सरपंच सौ.निर्मला त्रिंबक इंगोले यांचा आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार

सांगोला तालुक्यातील इटकी या गावच्या सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाच्या व आमादर डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कट्टर समर्थक सौ.निर्मला त्रिंबक इंगोले यांची बिनविरोध निवड संपन्न झाली..
मावळत्या सरपंच द्रोपदा महादेव सावंत यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता..त्यामुळे नुतन सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता त्यानुसार शुक्रवार दि.३१/१/२०२५ रोजी सरपंच पदाची निवडणुक पार पडली.या निवडणुकीत सौ.निर्मला इंगोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ.इंगोली यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
.सदर निवडीने इटकी ग्रामस्थातुन समाधान व्यक्त करण्यात येत होते. सरपंच निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सावंत यांनी परीश्रम घेतले.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रशांत जाधव यांनी व ग्रामसेवक प्रशांत आदाटे यांनी काम पाहीले..सदर निवडी प्रसंगी इटकी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन फटाक्याच्या आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला निवडीनंतर लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी नुतन सरपंच यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळेस माजी सरपंच सावंत ,उपसरपंच धुळा करचे,दादासो वाघमारे,शहाजी पाटील,धनाजी पाटील अशोक करचे,त्रिंबक इंगोले,रामभाऊ डोंगरे इत्यादी नेते गण उपस्थित आसल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.



