सांगोला(प्रतिनिधी):-माणदेश विद्यालय जुनोनीचे माजी प्राचार्य व गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक डॉक्टर बी आर फुले यांना राष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर बी. एम.भांजे बेस्ट अकॅडमीक एक्सलन्स अॅवार्ड फॉर लाईफ टाईम अॅचिव्हमेंट हा पुरस्कार मिळालेबद्दल गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्थेचेवतीने संस्थेचे चेअरमन मारुतीआबा बनकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
पँजिया जिओग्राफिकल असोसिएशन इंडिया ग्लोबल फाउंडेशन आणि महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद पुणे यांनी गांधी भवन कोथरूड येथे पर्यावरणीय न्याय या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ.बी.आर. फुले यांना राष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर बी. एम.भांजे बेस्ट अकॅडमीक एक्सलन्स अॅवार्ड फॉर लाईफ टाईम अॅचिव्हमेंट हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.