महाराष्ट्र

सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन चा हळदी कुंकू कार्यक्रम दिमाखात संपन्न 

 सांगोला शहर, तालुका आणि परिसरातील ग्राहकांसाठी सेवेत असलेले आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे खरेदी दालन म्हणून नावारूपास आलेले  सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन तसेच सूर्योदय फर्निचर मॉल यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला  हळदी कुंकू समारंभ अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातून सुमारे तीन हजाराहून अधिक लाडक्या बहिणींची अलोट गर्दी उसळली होती.  यावेळी  महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, समर्थ हॉस्पिटलच्या डॉ . विद्या इंगवले,  डॉ. संगीता पिसे, नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी अस्मिता निकम-सपकाळ, प्रभावती सोपल, माजी जि प सदस्या  राणीताई दिघे,  डॉ.  स्नेहल भोसले, चार्टर्ड अकाउंटंट मुजावर मॅडम, खरेदी विक्री संघाच्या द्रोपदी भगत, नीताताई ढोबळे, गीता क्षीरसागर, पोलीस अधिकारी सावंत मॅडम व जोंधळे मॅडम, स्वाती मगर इत्यादी मान्यवर महिला  उपस्थित होत्या.
यावेळी महिलांसाठी लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा त्याचबरोबर बकेट बॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करत होम मिनिस्टर अँकर अनुपमा गुळमिरे, सुनिता शिंदे आणि माधवी घोडके   यांनी या सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.  या तीनही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केलेल्या सुवर्णा शिंदे, दिपाली दौंडे व स्वाती खुळपे तसेच द्वितीय क्रमांक संपादन केलेल्या अनुक्रमे बेबी टेळे , ज्योती सरवदे व मनीषा घाडगे  त्याचबरोबर तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या अनुक्रमे शारदा काशीद, सुशीला भुसे व रूपाली गायकवाड इत्यादी भगिनींचा मानाची पैठणी तसेच इतर बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी यांनी  लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सूर्योदयच्या उद्योगाबद्दल आणि विविध उपक्रमाबद्दल माहिती देत यावेळी महिलांना देण्यात येत असलेल्या आकर्षक गिफ्ट कुपन विषयी माहिती सांगितली. सूर्योदय मॉलमध्ये दोन हजार रुपयांच्या खरेदीवर शंभर रुपयांची सूट या गिफ्ट कुपनद्वारे देण्यात आली असून सूर्योदय वस्त्रनिकेतन च्या वतीने तीन हजार रुपयांच्या खरेदीवर तब्बल पाचशे रुपयांची सूट या गिफ्ट कुपनद्वारे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नव्यानेच सुरुवात करण्यात आलेल्या  फर्निचर मॉल च्या वतीने दहा हजार रुपयांच्या खरेदीवर पाचशे रुपयांची सूट, वीस हजार रुपयांच्या खरेदीवर हजार रुपयांची सूट तसेच तीस हजार रुपयांच्या खरेदीवर तब्बल दोन हजार रुपयांची भरघोस सूट या गिफ्ट कुपनद्वारे देण्यात आलेली आहे. हे सर्व गिफ्ट कूपन्स 28 फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंतच उपयोगात आणावेत असं सांगत याद्वारे महिलांनी खरेदीचा आनंद लुटत जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.  यावेळी कल्पनाताई शिंगाडे,  डॉ. संगीता पिसे, डॉ. विद्या इंगवले, अस्मिता निकम मॅडम,सीए मुजावर मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले त्याचबरोबर सहसंस्थापक डॉ  बंडोपंत लवटे, सहसंस्थापक सुभाष दिघे गुरुजी आणि जगन्नाथ भगत गुरुजी यांनी आजवर एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय दूध विभाग तसेच सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन सारख्या अनेक उद्योग आणि संस्थांच्या माध्यमातून आपल्या कर्तुत्वाचे जाळे महाराष्ट्राच्या बाहेर देखील तयार केले असून आजवर हजारो कुटुंबे उभे करण्याचे  काम यांनी केले आहे.
अनिलभाऊंच्या कुशल मार्गदर्शनामुळे हा उद्योग समूह भविष्यात उत्तरोत्तर आणखी यशाची शिखरे गाठत जाईल अशा भावना सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या. उपस्थित सर्व महिलांना उपस्थितीबाबतचे एक लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. यातून शेवटपर्यंत उपस्थित असलेल्या सुमारे सात महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढून मानाच्या पैठण्या  प्रदान करण्यात आल्या. सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी मेडशिंगी सह सांगोला तालुक्यातील ग्राहकांच्या आशीर्वादावर पुढे जात असलेला उद्योग समूह आज महाराष्ट्राच्या पलीकडे गेलेला असून आपण सर्वांनी कायम सहकार्य करत सूर्योदयच्या उद्योग आणि व्यवसायांवरती असंच प्रेम करत राहिलात तर निश्चित आपण भविष्यात या क्षेत्रांमध्ये  देशव्यापी कार्य उभा करू असा विश्वास देत मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींचे विशेष अभिनंदन करत आभार मानले. कार्यक्रम स्थळी तांदळाच्या अनेक नमुन्यांचा  तांदूळ महोत्सव, फुटवेअर महोत्सव तसेच पैठणी आणि साडी महोत्सव त्याचबरोबर फर्निचर मॉल च्या वतीने संसारसेट आणि सोफासेट महोत्सव भरवण्यात आलेले होते.
सर्व स्टॉल्सना उपस्थित भगिनींनी भेट देत मॉल मधून मनमुराद खरेदीचाही आनंद यावेळी लुटला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अर्चनाताई इंगवले, सौ सुरेखाताई लवटे, सौ ज्योतीताई भगत व सौ मीनाक्षीताई दिघे त्याचबरोबर जयंत सोपल साहेब,  अजित काळुंगे, आनंद स्वामी, राहुल माळी यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button