महाराष्ट्र
दहावीचं वर्ष हे आयुष्यातील टर्निंग पॉईंट- श्री.विश्वेश झपके
सांगोला विद्यामंदिरमध्ये दहावीचा शुभेच्छा समारंभ संपन्न

सांगोला (वार्ताहर) इयत्ता दहावी हा सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असून इथूनच आपल्या जीवनाला कलाटणी मिळते. करिअर रुपी पुढील मार्ग इयत्ता दहावीनंतर विविध क्षेत्राद्वारे आपणास खुणावत असतात. वर्षभर आपण सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेल्या ज्ञानाचे तेज दाखवण्याची संधी येणाऱ्या एस.एस.सी. बोर्ड 2025 या परीक्षेतून आपणास मिळणार असून यशाची चव व त्याचं माधुर्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत व विद्यामंदिरची गौरवशाली परंपरा कायम राखावी असे आवाहन उद्योगपती विश्वेशजी झपके (कार्यकारणी सदस्य- सां.ता.शि.प्र.मंडळ) यांनी सांगोला विद्यामंदिरमध्ये आयोजित एस.एस.सी. बोर्ड परीक्षा 2025 साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले उपस्थित होते.
प्राचार्य अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना परीक्षेसंदर्भात आवश्यक सूचना विद्यार्थ्यांना दिल्या. परीक्षेनंतरच्या करिअरच्या वाटा निवडताना जे.ई.ई. व नीट यापरीक्षा संदर्भात शिवाजी चौगुले यांनी माहिती दिली.
यावेळी तनुजा चोपडे, समृद्धी भोसले, अविनाश सरगर, आकांक्षा फुले, दिव्याराणी देवडकर या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आजपर्यंत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये विद्यामंदिरचा सिंहाचा वाटा असून या शाळेचे व शाळेतील शिक्षकांचे ऋण आयुष्यभर न विसरण्याजोगे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी व आभार सौ.शैलजा झपके यांनी मानले.
उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
संस्थाअध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



