नदीपात्रात वाळूचा साठा; दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल
सांगोला(प्रतिनिधी):-कोणताही परवाना अगर पास परमिट न घेता पर्यावरणाचा र्हास होईल हे माहित असताना देखील स्वताचे आर्थिक फायद्या करीता कोरडा नदी पात्रातुन अज्ञात वाहनाने चार ब्रास वाळु चोरून घेवुन जावुन तसेच नदीपात्रात वाळूचा साठा करणार्या दोघां जणाविरुध्द सांगोला पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची घटना आगलावेवाडी ता.सांगोला येथे घडली असून तलाठी दिग्विजय पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी दिग्विजय पाटील हे सांगोला येथे असताना मला अनोळखी व्यक्तीने फोनव्दारे मौजे आगलावेवाडी ता. सांगोला नदी पात्रात वाळु उत्खन्न चालु आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी व मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व भोपसेवाडी पोलीस पाटील यांनी आगलावेवाडी येथील कोरडा नदी पात्रात जाऊन सर्वत्र फिरून पाहणी केली असता नदी पात्रामध्ये अंदाजे चार, चार ब्रासचे असे अंदाजे 8 ब्रासचे वाळुचे दोन ढिगारे करून वाळू साठा केल्याचे आढळुन आले आहे. त्यावेळी सदर वाळु साठा कोणी केला आहे याबाबत चौकशी केली असता, सदरची वाळु ही दोघांनी साठा करुन अंदाजे चार ब्रास वाळु नदी पात्रातुन अज्ञात वाहनाने चोरून घेवुन गेले असून सदर ठिकाणचा व वाळुचा सविस्तर पंचनामा केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.