फॅबटेक मध्ये बौद्धिक संपदा हक्क सप्ताह संपन्न

सांगोला : इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलद्वारे ( I I C ) आयोजित फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च येथे बौद्धिक संपदा हक्क सप्ताह (Intellectual Property Rights Week) उत्साहात साजरा झाला . हा सप्ताह २७ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल (IPR) जागरूकता निर्माण करणे आणि त्याचे महत्त्व समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. प्रकाश बनसोडे यांचे “बौद्धिक संपदा हक्क आणि त्यांची शैक्षणिक व औद्योगिक नवकल्पनांमधील भूमिका” या विषयावरील व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरले. त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व स्पष्ट करताना पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि औद्योगिक डिझाईन यांसारख्या संकल्पना ची सविस्तर स्पष्टीकरण दिले. विशेषतः शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात बौद्धिक संपदा कशी संरक्षण देते आणि नवसंशोधन व व्यावसायिक स्पर्धात्मकतेला कशी चालना देते, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी पेटंट शोधण्याच्या पद्धती, मसुदा तयार करण्याची प्रक्रिया, भारतातील पेटंट अर्ज दाखल करण्याची पद्धत व त्यासाठी लागणाऱ्या शुल्कांबाबतही सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानामुळे संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे महत्त्व व त्याचा व्यावहारिक उपयोग समजून घेण्यास मोठी मदत झाली.
पेटंट आणि औद्योगिक डिझाईन या दोन्ही संकल्पना बौद्धिक संपदेचा भाग असल्या तरी त्यांचा उद्देश वेगळा असतो. या व्याख्यानाच्या माध्यमातून, डॉ. प्रकाश बनसोडे यांनी संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेच्या संकल्पना आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले. त्यांनी बौद्धिक संपदा हक्क केवळ संरक्षणासाठी नव्हे, तर संशोधन आणि औद्योगिक प्रगतीसाठी कसे महत्त्वाचे आहेत, यावरही भर दिला.
फॅबटेक इंजिनिअरिंगच्या उप प्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी, बौद्धिक संपदा हक्क सप्ताह या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.तसेच बौद्धिक संपदा हक्काचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. औद्योगिक डिझाईन, व्यापार गुपिते, अंतर्गत माहिती, मागणीचे अंदाज हे सर्व वैयक्तिक किंवा खाजगी स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी स्वामित्व अधिकार, प्रकाशन अधिकार, व्यापारचिन्ह इत्यादी सामग्री व्यक्ती व संस्थेला मदत करत असते.
हा कार्यक्रम फॅबटेक संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर ,फॅबटेक इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फॅबटेक इंजिनिअरिंगच्या उप प्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, ॲकॅडमिक डीन डॉ. शरद पवार ,डॉ.तृप्ती बनसोडे .डॉ. संजय पवार यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख , सर्व प्राध्यापकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली पाटील व आभार प्रदर्शन प्रा.शिवानंद माळी यांनी केले.



