महाराष्ट्र

सांगोला येथे हरिनाम सप्ताह सुरू

सांगोला(प्रतिनिधी):-बेळगांव निवासी परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांच्या शिकवणीनुसार मंगळवार दि. 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हरिनामप्रचार सप्ताहाचे आयोजन सांगोला शहरातील श्री विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली येथे करण्यात करण्यात आले आहे.

8 फेब्रुवारी 2025 पर्यंत सप्ताह सुरु राहणार असून सकाळी 7.00 ते 8.30 वाजेपर्यंत प्रातः स्मरण व भजन ववाचन, सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत नेमाचे सायंस्मरण भजन व वाचन, सायंकाळी 6.00 ते 7 वाजेपर्यंत बालोपासना रात्रौ 8.30 ते 10 वाजेपर्यंत चातुमार्तसानंतरची एकादशी भजन होणार आहे

तरी या प्रचार सप्ताहास सांगोला शहर व परिसरातील बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सिद्धकला भजनी मंडळाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button