स्टेट बँक ऑफ इंडिया कडून विद्यामंदिर परिवारास वॉटर चिलर व आर.ओ. प्लॉंटची भेट

भारतीय स्टेट बँक शाखा सांगोला यांच्यावतीने सामाजिक जाणीव जोपासत सांगोला शहरातील विद्यार्थी संख्या व गुणवत्ता यांच्याबाबतीत अग्रेसर असणारी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथील विद्यार्थी व शिक्षक कर्मचारीवर्गांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी सुमारे 200 लिटर क्षमतेचे वॉटर चिलर व आर.ओ. प्लॉंट CSR फंडातून मशीन भेट देण्यात आले.भारतीय स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर निशांत जैस्वाल व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते फित कापून सदर मशीनचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वप्रथम सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस निशांत जयस्वाल यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
उद्धाटन समारंभावेळी जैस्वाल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना भारतीय स्टेट बँकेच्या वतीने वेतनधारक कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देत सदर योजनांचा लाभ घेण्याची विनंती केली. यावेळी संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांच्या हस्ते सोलापूरचे रिजनल मॅनेजर निशांत जैस्वाल, डेप्युटी मॅनेजर विकास नायडू, सांगोला शाखेचे मुख्य व्यवस्थापक कुलदीप देसाई, सहाय्यक व्यवस्थापिका शितल शिंदे, प्रकाश पाटील,सागर फडतरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तूद, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रशांत रायचुरे यांनी केले.