नाझरा विद्यामंदिरमध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*

नाझरा(वार्ताहार):’सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाझरा विद्यामंदिर प्रशाला,ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी सरगर,सामाजिक कार्यकर्ते विनायक शिवाजी मिसाळ, माजी सैनिक शिवाजी ऐवळे,आदर्श शिक्षक सिद्धेश्वर झाडबुके,माजी मुख्याध्यापक कोंडीबा वाघमारे,युवक नेते पिंटू बंडगर पत्रकार ज्योतिबा दत्तू,आनंदा सोनार,प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,मुख्याध्यापिका मंगल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर संस्था सचिवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे यांनी केले.राष्ट्रगीत,ध्वजगीत राज्यगीत व संविधान झाल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. नाझरा ग्रामपंचायतीसमोर सरपंच मंदाकिनी सरगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी नाढरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर प्रशालेच्या प्रांगणात संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी माजी मुख्याध्यापक धोंडीराम एकनाथ आदट, सिद्धेश्वर झाडबुके,दिनेश धोकटे, डॉ. मारुती मिसाळ, दिलावर नदाफ,सोमनाथ सपाटे,आर.जी.बंडगर,संभाजी सरगर यांच्याकडून आलेल्या रकमेतून पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सरगर,वसंत गोडसे,सोमनाथ सपाटे व प्रा. मोहन भोसले यांनी केले. माजी विद्यार्थिनी एम.डी परीक्षेत देशात सातवी व महाराष्ट्रात पहिली आलेली पूजा बाळू शेळके व सेट परीक्षा उत्तीर्ण दत्तात्रय वाघमोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या दोघांनी आपल्या मनोगतातून शाळेतील शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत या शाळेने आम्हाला कसे घडवले याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विनायक शिवाजी मिसाळ यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
त्यानंतर नाझरा विद्यामंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बहारदार नृत्य सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सदर सांस्कृतीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेश विभुते,कु. पल्लवी सरगर यांच्यासह सांस्कृतिक विभागातील शिक्षकांनी परिश्रम घेतले. परिसरातील विविध सेवाभावी संघटना, ग्रामपंचायत नाझरा त्याचबरोबर विविध शिक्षणप्रेमी लोकांनी, आजी-माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिला होता.प्राचार्य बिभीषण माने यांनी खाऊ दिलेल्या सर्व संघटना व ग्रामस्थांबाबत कृतज्ञता व्यक्त करत शाळेबद्दल चा स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो अशी अशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार प्रा. युवराज लोहार यांनी मांडले.



