महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांचेकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशीन प्रदान.

रोटरी क्लब यांचेकडून सांगोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना महिलांसाठी उपयुक्त अशी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशीन मोफत प्रदान करण्यात आली.
या संस्थेमध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी व कार्यरत महिलांसाठी या मशीनची अत्यंत गरज होती. शाळेतील स्वच्छता, हायजिन व महिलांच्या आरोग्यासाठी हे मशीन खूप उपयोगी आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी प्रस्ताविका मध्ये महिलांचे आरोग्य व रोटरीचे कार्य इत्यादी बाबत माहिती दिली. संस्थेचे मुख्याध्यापक श्री.ओम्बासे यांनी मार्गदर्शन करून रोटरीचे आभार मानले.तसेच कोळी या विद्यार्थिनीने रोटरी च्या कार्याचा व उपक्रमाचा गौरव केला.
या प्रसंगी रो. माणिक भोसले सो,रो.इंजि.विलास बिले व रो.अरविंद डोंबे गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.गव्वल मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास श्री.शिकलगार सर,श्री.कुलकर्णी सर,श्री.घोडके सर बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचा सर्व स्टाफ हजर होता.