*प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत लाभार्थी नोंदणी मेळावा संपन्न*

प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली.प्रथम टप्प्यात सांगोले शहरांमध्ये एकूण 280 घरे मंजूर झाली आहेत. मंजूर घरांपैकी 210 घरांची कामे पूर्ण झालेली असून उर्वरित घरेही प्रगतीपथावर आहेत.
शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना २.० घोषणा सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने इच्छुक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता सांगोले नगरपरिषदे मार्फत *PMAY UNIFIED WEB PORTAL* वर नवीन लाभार्थी नोंदणी मेळावा दि. ०७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्या मध्ये एकूण 45 लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे.
सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमित कोरे – स्थापत्य अभियंता, नवज्योत ठोकळे – सिटी कॉर्डिनेटर, शरद थोरात यांनी परिश्रम घेतले.
———————-
प्रधानमंत्री आवास योजना १.० मधून लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार झालेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना २.० च्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली असून मार्च 2025 पर्यंत लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे संपर्क साधावा.
डॉ. सुधीर गवळी,मुख्याधिकारी तथा प्रशासक,सांगोले नगरपरिषद