फॅबटेक चे डॉ. मनोज पाटील यांना पी.एचडी. प्रदान

सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सांगोला येथील आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग विभागामधील डॉ. मनोज पाटील यांना सनराईज विद्यापीठ अलवार (राजस्थान) यांच्याकडून रिअल-टाइम प्रक्रियेसाठी मशीन लर्निंग वापरून वस्तूंचा शोध घेण्यासाठी फ्रेमवर्क डिझाइन या विषयावरील सखोल संशोधनाबद्दल पीएच.डी. प्रदान केली आहे.
त्यांचा संशोधन प्रबंध यंत्रशिक्षण (Machine Learning) तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्षवेळ (Real-Time) वस्तू शोधण्याच्या कार्यक्षमता व वेगास वर्धित करणाऱ्या प्रणालीच्या डिझाइनवर आधारित आहे. या संशोधनामुळे सुरक्षा प्रणाली, स्मार्ट सिटी मॉनिटरिंग, औद्योगिक स्वयंचलित प्रणाली, आणि संगणकीय दृष्टि (Computer Vision) तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता आहे.
डॉ. मनोज पाटील यांनी डॉ. प्रदीप सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. या अभ्यासात विविध यंत्रशिक्षण पद्धतींचा वापर करून प्रत्यक्षवेळीत वस्तू शोधण्याचे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
फॅबटेक चे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर,व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर , डीन ॲकॅडमिक डॉ. शरद पवार यांनी प्रा डॉ. मनोज पाटील यांचे अभिनंदन केले.