महाराष्ट्र
आदर्श प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न`

आदर्श प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. प्रथम गोंदवले या ठिकाणी थांबून गोंदवले महाराजांचे दर्शन घेऊन पुढे उरमोडी धरण या ठिकाणी गेली. तिथे कार्यकारी अभियंता मा. गणेश कळसे यांनी उमरोडी नदीवरील उरमोडी धरणाविषयी तसेच विद्युत प्रकल्पविषयीं माहिती दिली. वीज कशी तयार केली जाते हे विद्यार्थ्यांनी जवळून पाहून त्या विषयी प्रश्न विचारून माहिती घेतली.
त्यानंतर सज्जनगड या ठिकाणी सहल गेली. तिथे रामदास स्वामी समाधीचे दर्शन घेऊन स्नेहभोजनाचा स्वाद घेतला. मुलांना खाऊवाटप करण्यात आला. त्यानंतर खरेदीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक वाघमोडे सर, श्रीमती. सुलेखा केदार मॅडम, श्री. मयुर सुरवसे सर, सौ. अनिता माने मॅडम, सौ. शितल माळी मॅडम, सौ. मयुरी नवले मॅडम, सौ. जयश्री वाघमोडे मॅडम उपस्थित होत्या.