महाराष्ट्र
मोजमापन तज्ञ राहुल ऐवळे यांचे निधन

सांगोला, आटपाडी, जत, आष्टा या परिसरात राहुल बाबासाहेब ऐवळे मोजमापन कामगिरीने ओळखले जात होते. सोमवार 21 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वाटंबरे ता. सांगोला येथे त्यांचे अपघाती निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 31 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी आठ वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले. राहुल यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



