लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्षपदी ला.उन्मेष आटपाडीकर यांची निवड; ला.अजिंक्य झपके सचिव तर ला.नरेंद्र होनराव खजिनदार

सांगोला (वार्ताहर) लायन्स क्लब ऑफ सांगोला सन २०२३-२४ चे पदाधिकारी व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये लायन वर्ष २०२३-२४ अध्यक्षपदी ला.उन्मेश आटपाडीकर, सचिवपदी ला.अजिंक्य झपके व खजिनदारपदी ला.नरेंद्र होनराव यांची निवड करण्यात आली.
माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी, संचालक,सदस्य सर्वसाधारण सभेमध्ये सदर निवडी जाहीर करण्यात आल्या.या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे लायन्स क्लब ऑफ सांगोला पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाजाला प्रेम आणि विश्वास देऊन सामाजिक, शैक्षणिक ,आरोग्य विभागात सेवाभावी वृत्तीने विधायक काम करणाऱ्या जगातील १६६ हून अधिक स्वतंत्र देशात २८५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्याला प्रमाण मानून दरवर्षी लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने सामाजिक अभ्युदयासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यापुढे ही समाजाच्या अभ्युदयासाठी क्लब कटिबद्ध राहील असे नूतन अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर यांनी सांगितले.