महाराष्ट्र
महिला समृध्दी व सुविधा कर्ज योजना- पात्र अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, विविध योजना राबविण्यात येतात.
सन 2024-25 या वित्तीय वर्षात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या मुंबई व राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांचेमार्फत 1. सुविधा कर्ज योजना- कर्ज रक्कम रुपये 5 लाख भौतिक उदिष्ट 60, आर्थिक उदिष्ट 300, प्राप्त प्रकरणे 265, पात्र प्रकरणे 238, चिठ्ठीद्वारे निवड 60. 2. महिला समृध्दी कर्ज योजना- कर्ज रक्कम रुपये 1.40 लाख भौतिक उदिष्ट 40, आर्थिक उदिष्ट 56, प्राप्त प्रकरणे 81, पात्र प्रकरणे 48, चिठ्ठीद्वारे निवड 40 असल्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी कर्ज योजना अंतर्गत कर्ज प्रकरण दाखल केलेल्या अर्जदारांची चिठ्ठीद्वारे निवड निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून प्रक्रियेसाठी पात्र अर्जदारांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.चव्हाण यांनी केले आहे.