महाराष्ट्र
नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

नाझरा(प्रतिनिधी):- नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. प्राचार्य बिभीषण माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शुभेच्छा समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य गंगाधर घोंगडे,कोळा विद्यामंदिर चे माजी प्राचार्य नारायण विसापूरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. गंगाधर घोंगडे म्हणाले की वर्षभर शिक्षकांनी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे, त्या ज्ञानाचा योग्य वापर कुशलतेने परीक्षेत करायचा आहे. बारावीनंतर जीवनातल्या अनेक परीक्षांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे त्यासाठी असणारा आत्मविश्वास तुम्हाला याच परीक्षेच्या माध्यमातून मिळणार आहे.सर्वांनी जीवनात नेहमी सकारात्मकता बाळगावी आणि आपल्या ध्येयाला गवसणी घालावी असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य बिभीषण माने यांनी जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांबद्दल माहिती देत येणाऱ्या परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल विस्तृतपणे आपले विचार व्यक्त केले.
प्रा. युवराज लोहार व रत्नप्रभा जुंधळे यांनी परीक्षेबाबतच्या विविध सूचना व विषयाबाबत काही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्यानंतर ऋतुजा चव्हाण, विद्या अडसूळ, आदित्य पाटील,समृद्ध मिसाळ सुदर्शन चौगुले यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल व शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश विभुते यांनी केले तर आभार प्रा. नारायण पाटील यांनी मांडले.