महाराष्ट्र
क्रांतीवीर वि.दा. सावरकर विद्यालयात इ १० वी वीचा निरोप समारंभ संपन्न.

क्रांतिवीर वि.दा. सावरकर विद्यालय चिणके या विद्यालयात इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ ग. भि. मिसाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सारंग विष्णू मिसाळ (मंञालय सहायक मुंबई) प्रा. स्नेहल रमेश मिसाळ इंजीनियर (सुझुकी कंपनी जपान) कु. ऋतुजा जगन्नाथ मिसाळt सिव्हिल इंजीनियर कु. अमृता शरद मिसाळ कॉम्पुटर इंजीनिअर हे होते. प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व सौ. मिसाळ मॅडम यांचे हस्ते विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी चिणके गावचे माजी सरपंच विनायक (दादा) मिसाळ, इंजीनियर रमेश मिसाळ, मेजर बाळासाहेब मिसाळ, कॅप्टन रामचंद्र मिसाळ, माजी सैनिक गोपाळ बापू मिसाळ, मेजर शंकर मिसाळ, मुख्या. पवार सर, भोसले मळा चिणके जि. प. प्रा. मुख्या. बंडगर सर, रमेश मिसाळ, मेजर शंकर मिसाळ, प्रगतशील शेतकरी रघुनाथ मिसाळ इ. मान्यवर उपस्थित होते. विनायक दादा, पवार गुरुजी. बंडगर गुरुजी, रमेश मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे सारंग मिसाळ, कु स्नेहल मिसाळ, कु. ऋतुजा शितोळे, कु. अमृता मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. सहदेव ऐवळे सर यांनी 10 वी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, देशाचा जबाबदार नागरिक बनावे. देश हाच माझा देव मानले पाहिजे. शिस्त व वक्तशीरपणा भविष्याला आकार देतो असे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मोहन मिसाळ यांनी केले. सूत्र संचालन कु. वेदिका विनायक मिसाळ व कु. समृद्धी संजय मिसाळ यांनी केले. आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले. पाटील स, जाधव सर, पवार सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले