सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षार्थीं विद्यार्थ्यांचे स्वागत

सांगोला (प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२५ पहिला पेपर विषय इंग्रजी परीक्षार्थीं विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमख्याध्यापिका शहिदा सय्यद, केंद्र संचालक उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले व उपकेंद्रसंचालक प्रा. चिंतामणी देशपांडे, प्रा. शिवशंकर तटाळे, प्रा. इसाक मुल्ला, रनर प्रा.डी.के.पाटील, स्टेशनरी सुपरवायझर प्रा.दिलीप मस्के, दक्षता समिती सदस्या अनुराधा खडतरे तसेच दादासाहेब खडतरे, सांगोला विद्यामंदिर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत केले.

सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती प्रतिमा व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर, नाझरा विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल प्रातिनिधीक परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,केंद्र क्रमांक ४८२ सांगोला विद्यामंदिर अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,सांगोला सांगोला नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरा,न्यु इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, सांगोला परीक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



